33 बळी, 940 नवे रूग्ण, 1822 कोरोनामुक्त, कोरोना मृत्यू, नवे रूग्ण, सक्रीय रूग्णसंख्येत घट, दोन महिन्यांनंतर सक्रीय रूग्ण 10 हजारांखाली, दैनंदिन पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 हजाराखांली,दिवसभरात शहरातील 14 जणांचा कोरोनाने मृत्यू
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील 14 तर परजिल्ह्यांतील तिघांचा समावेश आहे. दिवसभरात 940 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 822 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 9 हजार 241 झाली आहे. दोन महिन्यांनंतर सक्रीय रूग्णसंख्या 10 हजारांखाली आली आहे. दैनंदिन पॉझिटिव्ह रूग्णसंख्याही 1 हजारांखाली आली आहे. नव्या रूग्णासह सक्रीय रूग्णसंख्या घटली आहे.
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 446 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 362, नगरपालिका क्षेत्रात 672, शहरात 905 तर 507 अन्य आहेत. दिवसभरात 1 हजार 822 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 28 हजार 713 झाली आहे. गेल्या 24 तासांत 940 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 42, भुदरगड 31, चंदगड 7, गडहिंग्लज 29, गगनबावडा 2, हातकणंगले 134, कागल 36, करवीर 153, पन्हाळा 56, राधानगरी 28, शाहूवाडी 9, शिरोळ 60, नगरपालिका क्षेत्रात 62, कोल्हापुरात 265, अन्य 26 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 42 हजार 400 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून सोमवारी 2 हजार 433 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 144 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 5 हजार 734 अहवाल आले. त्यातील 5 हजार 368 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 752 रिपोर्ट आले. त्यातील 467 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 8 हजार 919 स्वॅब रिपोर्ट आले.
शहरात कोरोनाने 14 जणांचा मृत्यू, परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू
कोरोनाने परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 2 तर बेळगाव जिल्ह्यातील एक आहे. कोल्हापूर शहरातील 14 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये शुक्रवार पेठ, शिवाजी पार्क, आपटेनगर, लक्षतीर्थ वसाहत, यादवनगर, गजानन महाराजनगर, शाहू मिल कॉलनी राजारामपुरी, म्हाडा कॉलनी नवा वाशी नाका, कदमवाडी, रामानंदनगर, रूईकर कॉलनी, सम्राटनगर, तुषार बंगला रूईकर कॉलनी, विचारे माळ येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण 940 : एकूण : 1,42,400
कोरोनामुक्त 1822 : एकूण : 1,28,713
कोरोना मृत्यू 36 : एकूण मृत्यू : 4446
सक्रीय रूग्ण : 9304