ऑनलाईन टीम
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव पुन्हा वाढला आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार पार गेली असून 2 हजार 119 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णसंख्या पुन्हा एकदा 10 हजार पार गेली असून जिल्ह्यात 10 हजार 682 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या 24 तासात कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला. ही वाढती आकडेवारी कोल्हापूरकरांसाठी चिंता वाढवणारी आहे.
कोल्हापूर शहरातही आज कोरोनाचे 395 रुग्ण आढळले. जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 58 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 278 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 1 लाख 34 हजार 12 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हय़ात शुक्रवारी कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 584 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 449, नगरपालिका क्षेत्रात 684, शहरात 939 तर अन्य 512 आहेत. दिवसभरात 1 हजार 58 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 34 हजार 12 झाली आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 119 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 18, भुदरगड 38, चंदगड 38, गडहिंग्लज 77, गगनबावडा 8, हातकणंगले 270, कागल 76, करवीर 648, पन्हाळा 182, राधानगरी 44, शाहूवाडी 61, शिरोळ 80, नगरपालिका क्षेत्रात 119, कोल्हापुरात 395 तर अन्य 20 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 49 हजार 278 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 25 हजार 418 अहवाल आले. त्यापैकी 23 हजार 299 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 2 हजार 335 अहवाल आले. त्यातील 2 हजार 127 निगेटिव्ह आहेत. अŸन्टीजेन टेस्टचे 21 हजार 968 अहवाल आले. त्यातील 20 हजार 514 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 115 रिपोर्ट आले. त्यातील 658 निगेटिव्ह आहेत.
शहरात कोरोनाने 6 जणांचा मृत्यू,
शुक्रवारी परजिल्हय़ातील बेळगाव व सांगलीतील प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये मुक्तसैनिक वसाहत, विचारे माळ, राजारामपुरी, कुंभार गल्ली शाहूपुरी, नाना पाटीलनगर, कनाननगर येथील व्यक्तींचा समावेश आहे.
गेल्या काही काळात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढ सुरूच आहे. गेल्या आठवडाभरात कमी होत असणाऱ्या रुग्ण संख्येने आज पुन्हा उसळी घेतली. त्यामुळे लॉकाडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच दहा हजारांच्या खाली आली होती. मात्र, आज पुन्हा ही रुग्णसंख्या दहा हजार पार गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा वासियांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.