प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी, गेंल्या 24 तासांत म्युकर मायकोसीसचे 5 नवे रूग्ण दाखल झाले. म्युकरमुक्त झालेल्या 40 जणांना घरी पाठवण्यात आले. शहरातील सीपीआरमध्ये गुरूवारी 3 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 2 नवे रूग्ण दाखल झाले.
सीपीआरमधून 22 आणि खासगी हॉस्पिटलमधून 13 अशा 40 म्युकरमुक्तांना डिसचार्ज देण्यात आला. सध्या सीपीआरमध्ये 95 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 41 रूग्ण उपचार घेत आहेत. म्युकर बळींची संख्या 33 वर पोहोचली. आजपर्यत म्युकर रूग्णांना 6 हजार 466 इतकी इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत. आजपर्यत म्युकरचे 214 रूग्ण झाल्याची माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.