प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी म्युकर मायकोसिसचे 2 नवे रूग्ण दाखल झाले. तसेच 5 जणांना डिस्चार्ज दिला आहे. दिवसभरात म्युकर मृत्यूची नोंद निरंक असल्याची माहिती सीपीआरच्या बाह्यसंपर्क अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी म्युकरचे 2 नवे रूग्ण दाखल झाले. तर म्युकर मृत्यूंची नोंद निरंक राहिली. आजपर्यंत म्युकरने 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 106 जण म्युकरमुक्त झाल्याची माहिती डॉ. वेदक यांनी दिली.