वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित
कोल्हापूर / प्रतिनिधी:
सोमवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आज मंगळवारी देखील कायम आहे. सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गगनबावडा तालुक्यात सुमारे 137 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांत पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी खालील प्रमाणे मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 7.50 (228.88), शिरोळ- 3.86 (199.29), पन्हाळा- 49 (664.29), शाहूवाडी- 43.67 (947.83), राधानगरी- 55 (953.33), गगनबावडा- 137 (2604), करवीर- 29.09 (495), कागल- 39.86 (663), गडहिंग्लज- 27.14 (481.57), भुदरगड- 36 (784.20), आजरा- 62.75 (1077.75), चंदगड- 72.50 (1077.83) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
धरणसाठा कोयनेतून 1139 तर अलमट्टीतून 6922 क्युसेक विसर्ग ; 5 बंधारे पाण्याखाली जिल्ह्यातील राधानगरी धरणात 171.59 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार कोयनेतून 1139 तर अलमट्टी धरणातून 6922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, शिंगणापूर व रूई, भोगावती नदीवरील –खडक कोगे व वारणा नदीवरील-चिंचोली असे एकूण पाच बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 54.204 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 91.130 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 56.59 दलघमी, वारणा 677.42 दलघमी, दूधगंगा 494.07 दलघमी, कासारी 55.37 दलघमी, कडवी 43.29 दलघमी, कुंभी 56 दलघमी, पाटगाव 79.75 दलघमी, चिकोत्रा 23.20 दलघमी, चित्री 29.91 दलघमी, जंगमहट्टी 25.49 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.1 फूट, सुर्वे 14.10 फूट, रुई 42.6 फूट, इचलकरंजी 37.6 फूट, तेरवाड 34.6 फूट, शिरोळ 26.6 फूट, नृसिंहवाडी 21 फूट, राजापूर 10 फूट तर नजीकच्या सांगली 4.3 फूट व अंकली 3.7 फूट अशी आहे.