जिल्ह्यामध्ये सक्रीय रूग्ण 950, संशयित रूग्ण 300 च्या खाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी सात महिन्यांनंतर प्रथमच सक्रीय रूग्णसंख्या 1 हजाराखाली तर संशयित रूग्णसंख्या 300 च्या खाली आली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे 950 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. संशयित 289 आहेत. शुक्रवारी कोरोनाने एकाचा मृत्यू झाला, 56 नवे रूग्ण दिसून आले तर 130 जण कोरोनामुक्त झाले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने सीपीआर हॉस्पिटलमध्ये माणदुर्ग ( ता. चंदगड ) येथील 75 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 56 नवे रूग्ण दिसून आले तर 130 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 482 झाली. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 48 हजार 72 झाली आहे. सध्या 950 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 289 संशयितांची तपासणी केल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या 950 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 465 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 429 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 100 रिपोर्ट आले. त्यापैकी 95 निगेटिव्ह आहेत. कोरोना बळींची संख्या 1 हजार 640 झाली आहे. ग्रामीण भागात 805, नगरपालिका क्षेत्रात 338 महापालिका क्षेत्रात 359, अन्य 138 जणांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत 130 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 482 झाली आहे. चंदगड 1, भुदरगड 1, गगनबावडा 1, हातकणंगले 2, कागल 1, करवीर 8, पन्हाळा 1, शाहूवाडी 6, शिरोळ 5, नगरपालिका क्षेत्रात 6, कोल्हापूर शहर 17 आणि अन्य 5 असे 56 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 56, कोरोनामुक्त 130, कोरोना मृत्यू 1
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 48 हजार 072
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण : 45 हजार 482
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण : 950
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी : 1 हजार 640
गेल्या 24 तासांत 289 संशयित रूग्ण तपासणी