जिल्ह्यात 80 नवे रूग्ण, 32 कोरोनामुक्त, सक्रीय रूग्णसंख्या 514 वर, जिल्हा प्रशासनाची उपाययोजनांचा आढावा
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिली. पण दिवसभरात 80 नवे रूग्ण दिसून आल्याने सक्रीय रूग्णसंख्या 514 वर पोहोचली आहे. कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने सोमवारी, 22 रोजी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजनांचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 32 जण केरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात रविवारी कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिली. त्यामुळे बळींची संख्या 1756 आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 855, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 390 तर अन्य 162 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 32 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 17 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 80 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 2, चंदगड 1, गडहिंग्लज 4, गगनबावडा 0, हातकणंगले 4, कागल 0, करवीर 5, पन्हाळा 1, राधानगरी 2, शाहूवाडी 1, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 12, कोल्हापूर शहरात 42 तर अन्य 5 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी 629 जणांची तपासणी केली. त्यातील 74 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्ण वाढल्याने सक्रीय रूग्णसंख्या 517 झाली आहे. दरम्यान, रूग्णसंख्या 500 च्या वर गेल्याने सोमवारी होणाऱया कोरोना आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून आलेल्या 944 अहवालापैकी 879 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 133 अहवाल आले. त्यातील 122 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 220 रिपोर्ट आले. त्यातील 180 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51287 झाले आहेत. त्यापैकी 49 हजार 17 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 514 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
शहरात 252 तर ग्रामीणमध्ये 88 होम क्वारंटाईन
शहर आणि परिसरात 252 कोरोना रूग्णांना होम आयसोलेटेड केले आहे तर ग्रामीण भागात 88 जणांना होम कोरोंटाईन केले आहे. आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हेही सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली.
कोरोना रूग्ण 80 : एकूण : 51287
कोरोनामुक्त 32 : एकूण : 49017
कोरोना मृत्यू : 0 : एकूण मृत्यू : 1756
सक्रीय रूग्ण : 514