29 बळी, 1522 नवे रूग्ण, 911 कोरोनामुक्त,
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी, गेल्या 24 तासांत कोरोना नवे रूग्ण, मृत्यू व कोरोनामुक्तांतही घट झाली. पण सक्रीय रूग्णसंख्या 14 हजारांपर्यत पोहोचली आहे. वाढती सक्रीय रूग्णसंख्या नियंत्रित करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 29 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 777 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 560, नगरपालिका क्षेत्रात 703, शहरात 985 तर अन्य 527 आहेत. दिवसभरात 911 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 40 हजार 635 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 522 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 44, भुदरगड 36, चंदगड 13, गडहिंग्लज 87, गगनबावडा 2, हातकणंगले 168, कागल 50, करवीर 321, पन्हाळा 108, राधानगरी 29, शाहूवाडी 11, शिरोळ 93, नगरपालिका क्षेत्रात 116, कोल्हापुरात 420 तर अन्य 24 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 59 हजार 343 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 15 हजार 49 अहवाल आले. त्यापैकी 13 हजार 527 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 576 अहवाल आले. त्यातील 3 हजार 264 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 8 हजार 417 अहवाल आले. त्यातील 7 हजार 727 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 3 हजार 56 रिपोर्ट आले. त्यातील 2 हजार 536 निगेटिव्ह आहेत.
शहरातील चौघांचा कोरोनाने मृत्यू
परजिल्ह्यातील दोघांचा तर कोल्हापूर शहरातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील फुलेवाडी, सुभाषनगर येथील प्रत्येकी एक तर राजारामपुरीतील दोघांचा कोरोना मृत्यूमध्ये समावेश आहे.
कोरोना रूग्ण 1522 : एकूण : 1,59,343
कोरोनामुक्त 911 : एकूण : 1,40,635
कोरोना मृत्यू 29 : एकूण मृत्यू : 4777
सक्रीय रूग्ण : 13931