1659 जणांची कोरोनावर मात, 40 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / कोल्हापूर :
जिल्ह्यात मागील 24 तासात 2219 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 1649 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील स्थिती पाहता सर्वाधिक रुग्ण शहरात आढळून येत आहेत. मागील चोवीस तासात शहरात 546 नवे रुग्ण आढळले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासन अलर्ट आहे. आरोग्य विभागाकडून संशयितांच्या तपासण्या सुरु आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील 24 तासात जिल्ह्यात 2219 इतके नवे रुग्ण आढळले. यामध्ये आजरा 32, भुदरगड 53, चंदगड 39, गडहिंग्लज 93, गगनबावडा 5, हातकणंगले 374, कागल 60, करवीर 298, पन्हाळा 139, राधानगरी 37, शाहूवाडी 56, शिरोळ तालुक्यात 56 रुग्ण आढळले. कोल्हापूर शहरात 546 तर इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, गडहिंग्लज, कागल, शिरोळ, हुपरी, पेठवडगांव, मलकापूर, मुरगूड आदी नगरपालिका क्षेत्रात 190 रुग्ण आढळले. तसेच परजिल्हा आणि परराज्यातून आलेले 121 संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
मागील चोवीस तासात आरटीपीसीआर आणि सीबीएनएनटी टेस्टींग केलेल्या 5499 संशयितांचा अहवाल प्राप्त झाला. यापैकी 4457 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 975 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ऍन्टिजेन टेस्टचे 4365 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 3835 निगेटिव्ह तर 530 संशयित पॉझिटिव्ह आढळले. खासगी रुग्णालय, लॅबमधून प्राप्त झालेल्या 1940 अहवालांपैकी 714 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.