प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 671 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोना मुक्ताची संख्या 12948 झाली आहे. तसेच 640 नवीन रुग्ण दिसून आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 22 हजारांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी मृत्यू झालेल्यात पेठ वडगाव येथील 65 वर्षीय पुरुष, कागल येथील 75 वर्षीय पुरुष, सांगली खणभाग येथील 45 वर्षीय महिला, कसबा बावडा येथील 68 वर्षीय महिला, सरनोबतवाडी येथील 77 वर्षीय पुरुष, रुकडी येथील 80 वर्षीय पुरुष, पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी येथील 76 वर्षीय पुरुष, कळंबा येथील 59 वर्षीय पुरुष, इचलकरंजी येथील आमराई मळा येथील 62 वर्षीय पुरुष, माणगाव येथील 75 वर्षीय पुरुष, शिरोळ येथील 78 वर्षीय पुरुष, कबनूर येथील 64 वर्षीय पुरुष, कोरोची येथील 65 वर्षीय महिला , अब्दुललाट येथील 70 वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील 46 वर्षीय पुरुष, राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील 70 वर्षे पुरुष,4 वडणगे येथील 69 वर्षीय पुरुष, आजरा येथील 70 वर्षे पुरुष, भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथील 64 वर्षे पुरुष आणि शहरातील फुलेवाडी अयोध्या कॉलनी येथील 51 वर्षे पुरुषांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना मृत्यूची आजपर्यंतची संख्या 654 वर पोहोचली आहे. ग्रामीण भागात 241, नगरपालिका क्षेत्रात 207, कोल्हापूर शहरात 181 आणि अन्य 26 यांचा या मृत्यूंमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 641 नवे रुग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 2, चंदगड 6 गडहिंग्लज 11 गगनबावडा 1 हातकलंगले 94 , कागल 24, करवीर 69, पन्हाळा 38 राधानगरी 21, शाहुवाडी 11, शिरोळ 38, नगरपालिका क्षेत्र 99, कोल्हापूर शहर 207 आणि इतर 21 जणांचा नव्या यात समावेश आहे.
गेल्या 24 तासात लॅबचे 1673 रिपोर्ट आले त्यापैकी 994 निगेटिव्ह तर 368 पॉझिटिव आहेत ऑटीजेनचे टेस्ट 678 आले त्यापैकी 605 निगेटिव्ह आहेत त्यात 73 पॉझिटिव आहेत. एकूण 640 नवे रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
आजपर्यंतचे पॉझिटिव्ह रुग्ण 21723
कोरोनामुक्त रुग्ण 12948
उपचारात 8121
आजपर्यंतचे कोरोना मृत्यू 654