प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात 11 महिन्यांनी रविवारी एकूण कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांवर पोहोचली. गेल्या 24 तासांत 13 नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे आजपर्यंतची रूग्ण संख्या 50 हजार 8 झाली आहे. रविवारी शहरातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. सक्रीय रूग्णसंख्या 115 झाली आहे. पण दिवसभरात एकही कोरोनामुक्त झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने सीपीआर हॉस्पिटलमध्ये रामानंदनगर येथील 73 वर्षीय पुरूष आणि कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये लक्षतीर्थ वसाहतीतील 67 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 729 झाली आहे. ग्रामीण भागात 849, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 377 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. रविवारी 13 नवे रूग्ण दिसून आले. सध्या 115 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 137 जणांची तपासणी केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून रविवारी 718 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 701 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 51 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 74 रिपोर्ट आले, त्यापैकी 68 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 3, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 10 व अन्य 0 असे 13 रूग्ण आहेत. नव्या 13 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 50 हजार 008 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
शहरात कोरोनाने दोघांचा मृत्यू, 10 नवे रूग्ण
सक्रीय रूग्णसंख्या 115, नवे रूग्ण 13
पॉझिटिव्ह रूग्ण 13, कोरोनामुक्त 0, कोरोना मृत्यू 2
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 50 हजार 008
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 164
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 115
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1729
गेल्या 24 तासांत 137 संशयितांची तपासणी