प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी गेल्या 24 तासांत 19 नवे रूग्ण दिसून आले. दिवसभरात 14s जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिली. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1729 आहे. सोमवारी 9 नवे रूग्ण मिळाले. दिवसभरात 462 जणांची तपासणी केली. 14 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 243 झाली आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत आरटीपीसीआर, सीबीनॅट चाचणीच्या 968 प्राप्त अहवालापैकी 930 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन चाचणीचे सर्व 34 अहवाल निगेटिव्ह आहेत. 50 हजार 108 पॉझिटिव्हपैकी 48,243 जणांना डिस्चार्ज दिला आहे. जिह्यात सध्या 135 सक्रीय रुग्ण आहेत. दिवसभरातील 9 नव्या रूग्णांत शाहूवाडीतील 1 आणि कोल्हापूर शहरातील 8 आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 9, कोरोनामुक्त 14, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 50 हजार 108
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 243
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 135
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1729
गेल्या 24 तासांत 462 संशयितांची तपासणी