रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, प्रशासनाची चिंता वाढली
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तास जिल्ह्यात 231 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. सहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये चार रुग्ण शहरातील आणि उर्वरीत दोन रुग्ण शिये व नागांव येथील आहेत. तर दिवसभरात 70 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली. दूसऱया लाटेत एका दिवसात जिल्ह्यातील रुग्णंसख्या प्रथमच सव्वा दोनशेच्यावर गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंगळवारअखेर जिल्ह्यातील ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 1269 इतकी झाली.
जिल्हा आरोग्य विभागाकडे मागील चोवीस तासात तपासणी केलेल्या 1763 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. 1230 जणांची आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी टेस्ट करण्यात आली. यामधून 120 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. 206 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामधील 23 जणा बाधीत आढळले. तर खाजगी रुग्णालये आणि लॅबकडून प्राप्त झालेल्या 237 अहवालांमधून 88 रुग्ण कोरोना बाधित आल्याचे स्पष्ट झाले. असे एकूण 231 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
पॉझिटिव्ह अहवालानुसार भूदरगड, राधानगरी प्रत्येकी 1, गडहिंग्लज 3, हातकणंगले 12, कागल 8, करवीर 20, पन्हाळा 3, शाहूवाडी 5 आणि शिरोळ तालुक्यात 6 रुग्ण आढळले. तर कोल्हापूर शहरात 114 आणि नगरपालिका हद्दीत 32 रुग्ण सापडले. तसेच परजिल्हा व राज्यातून आलेले 26 जणा कोरोनाबाधित आले आहेत. तर आजरा, चंदगड आणि गगनबावडा या तीन तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.