प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 25 नवे रुग्ण मिळून आले. तर तिघां कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 45 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या 336 इतकी आहे.
आरोग्य विभागाकडून रविवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये भूदरगड, चंदगड, गगनबावडा, कागल, राधानगरी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. गडहिंग्लज, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण मिळाला. आजरा तालुक्यात 3 आणि करवीर, शाहूवाडी तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण मिळून आले. आरटीपीसीआर 300 अहवालांमधून दोन, अँटीजेनच्या 387 अहवालामधून तीन आणि खासगी हॉस्पिटल, लॅबमधून प्राप्त झालेल्या 1516 अहवालांमधून 20 अहवाल पॉझिटीव्ह मिळाले.