प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 25 जणांचा मृत्Îू झाला. दिवसभरात 1 हजार 356 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 351 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 742 झाली आहे. जिल्ह्यात नव्या रूग्णांत वाढ झाली असली तरी कोरोना मृत्यू, सक्रीय रूग्णांत घट झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 183 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 793, नगरपालिका क्षेत्रात 730, शहरात 1 हजार 106 तर अन्य 554 आहेत. दिवसभरात 1 हजार 351 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 65 हजार 674 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 356 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 44, भुदरगड 18, चंदगड 12, गडहिंग्लज 60, गगनबावडा 3, हातकणंगले 212, कागल 112, करवीर 276, पन्हाळा 87, राधानगरी 48, शाहूवाडी 32, शिरोळ 102, नगरपालिका क्षेत्रात 112, कोल्हापुरात 211 तर अन्य 27 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 83 हजार 599 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 18 हजार 727 अहवाल आले. त्यापैकी 17 हजार 337 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 4 हजार 486 अहवाल आले. त्यातील 4 हजार 335 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 174 अहवाल आले. त्यातील 2 हजार 908 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 11 हजार 67 रिपोर्ट आले. त्यातील 10 हजार 94 निगेटिव्ह आहेत.
परजिल्ह्यातील दोघांचा तर शहरातील 7 जणांचा कोरोनाने मृत्यू
परजिल्ह्यातील सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी एक तर कोल्हापूर शहरातील 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूंमध्ये बिंदू चौक, कसबा बावडा, महालक्ष्मी कॉलनी, रिंगरोड बोंद्रेनगर, अंबाई टँक, शुक्रवार पेठ, लाईन बाजार येथील व्यक्तींचा समावेश आहे.
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 211 1145 1356
आजपर्यतचे बाधीत 49456 1,34,143 1,83,599
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1351 1,65,674
दिवसभरातील मृत्यू 7 18 25
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 1106 4077 5183
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 117 4335 4486
अँटीजेन 266 2908 3174
ट्रुनेट 973 11067 10094
…………………
सक्रीय रूग्ण 12,742
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 90.23 टक्के
एकूण चाचण्या ः शुक्रवार ः 18727 एकूण 13,59,653
मृतांची संख्या ः 25 जिल्हा ः 23 बाहेरील ः 2
दीर्घकालीन व्याधी 7 0
60 वर्षावरील 15 2
पहिल्या 48 तासांत मृत्यू 7 0
आजअखेर मृत संख्या 5183 जिल्हा ः 4629 अन्य ः 554