शहरासह जिल्ह्यातील केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असल्याने शुक्रवारी जिल्हÎातील 200 लसीकरण केंद्रे बंद होती, पण शनिवारी कोविशिल्डचे 1 लाख डोस उपलब्ध झाले. त्यामुळे लस देण्यास सुरूवात झाली. रविवारी सुटीदिवशी शहरासह जिल्हÎातील लसीकरण केंद्रंावर लसीसाठी गर्दी, रांगा लागल्याचे दिसून आले. सध्या उपलब्ध लस बुधवारपर्यत पुरणार आहे. बुधवारी आणखी 1 लाख 80 हजार डोस मिळणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यत 10 लाख लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. सध्या 16 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व अन्य लाभार्थीचा समावेश आहे. लसीकरणासाठी शासकीय आणि खासगी हॉस्पिटल्स मिळून 250 केंद्रे आहेत. यातील 100 कें द्रांवर गुरूवारी लसीचा तुटवडा जाणवला, शुक्रवारी आणखी 110 केंद्रांवर लस नसल्याने लसीकरण झाले नाही. परिणामी 40 केंद्रांवर लसीकरण सुरू राहिले.
जिल्ह्यात शनिवारी आरोग्य विभागाला 1 लाख कोविशिल्ड लस आली. ती तातडीने वितरीत केली. त्यामुळे इमर्जन्सीसाठीच्या 40 केंद्रांसह अन्य केंद्रांवर शनिवारी लसीकरण सुरू झाले. रविवारी लस आल्याचे समजताच शहरासह जिल्हÎांतील केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी झाली. सीपीआर, सावित्रीबाई फुले, पंचगंगा, आयसोलेशन हॉस्पिटल आणि 9 नागरी आरोग्य केंद्रावर लससाठी रांगा लागल्या. खासगी हॉस्पिटल्समध्ये हीच स्थिती होती. दरम्यान आलेली लस बुधवारपर्यत जिल्ह्याला पुरणार आहे. बुधवारी मागणी केल्याप्रमाणे आणखी 1 लाख 80 हजार डोस उपलब्ध होणार असल्याचे डॉ. देसाई यांनी स्पष्ट केले.