जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात बाहेरुन येणाऱयांमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. मंगळवारी सकाळी कोरोग्रस्तांची संख्या 83 होती. सायंकाळी 6 वाजेपर्यंत यामध्ये नव्या 39 रुग्णांची भर पडल्याने जिह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर पोहोचली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
बी. जे मेडिकल कॉलेज पुणे येथील प्रयोगशाळेतून सायंकाळी 6 वाजता 35 अहवाल प्राप्त झाले. तर सीपीआर रुग्णालयातून 4 जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे सर्वच 39 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये 25 पुरुष तर 14 महिलांचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंतची कोरोना पॉझिटिव्हची अधिकृत आकडेवारी 83 असल्याचे सांगितले होते. तर आज 39 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर पोहचली.