1567 कोरोनामुक्त, 1939पॉझिटिव्ह, सक्रीय रूग्णसंख्या 10 हजारांकडे, एकूण रूग्णसंख्या 70 हजारांकडे
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गेल्या 48 तासांत कोरोनाने 71 जणांचा मृत्यू झाला. 1939 नवे रूग्ण आढळून आले तर 1939 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 9660 झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्या 10 हजारांकडे पोहोचत असून आजपर्यतची रूग्णसंख्या 70 हजारांकडे पोहोचली आहे.
महाराष्ट्रदिनी 1 मे रोजी सुटी होती, पण या दिवशी 37 जणांचा मृत्यू झाला, 1123 नवे रूग्ण दिसून आले तर 780 जण कोरोनामुक्त झाले. रविवारी कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. 816 नवे रूग्ण आढळले तर 787 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे 48 तासांत कोरोनाने 71 जणांचा मृत्यू झाला तर 1939 नवे रूग्ण आढळले आहेत. रविवारी कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 2 हजार 328 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 143, नगरपालिका क्षेत्रात 408, शहरात 503 तर अन्य 274 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 729 जणांची तपासणी केली. सक्रीय रूग्णसंख्या 9 हजार 660 झाली आहे. दिवसभरात 787 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 57 हजार 926 झाली आहे. शहरात 1 हजार 108 तर ग्रामीण भागात 4 हजार 882 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
गेल्या 24 तासांत 816 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 27, भुदरगड 45, चंदगड 41, गडहिंग्लज 37, गगनबावडा 20, हातकणंगले 63, कागल 50, करवीर 78, पन्हाळा 20, राधानगरी 13, शाहूवाडी 35, शिरोळ 93, नगरपालिका क्षेत्रात 78 कोल्हापुरात 177 तर अन्य 39 जणांचा समावेश आहे. कोरोनाची एकूण रूग्णसंख्या 69 हजार 914 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 2 हजार 903 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 315 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 1 हजार 184 अहवाल आले. त्यातील 1005 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 397 रिपोर्ट आले. त्यातील 276 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील 29 जणांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शनिवारी 37 बळी, 780 कोरोनामुक्त
दरम्यान, शनिवारी कोरोनाने 37 जणांचा मृत्यू झाला, तर 780 जण कोरोनामुक्त झाले, 1 हजार 123 नवे रूग्ण दिसून आले. सक्रीय रूग्णसंख्या 9 हजार 665 वर पोहोचली होती. दरम्यान, आरटीपीसीआर लॅबमधून 5 हजार 400 जणांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये स्वॅब, ऍटीजेन, ट्रुनेट टेस्टचा समावेश आहे. शनिवारी 2 हजार 741 जणांची तपासणी केल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली.
48 तासांतील कोरोना रूग्ण 1939 : एकूण : 69914
कोरोनामुक्त 1567 : एकूण : 52926
कोरोना मृत्यू 71 : एकूण मृत्यू : 2328
सक्रीय रूग्ण : 9660