इचलकरंजीतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी इचलकरंजीतील कमल लक्ष्मीनगरातील 65 वर्षीय पुरूषाचा येथील नागाळा पार्कमधील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळीची संख्या 1758 झाली आहे. दिवसभरात 65 नवे रूग्ण दिसून आल्याने सक्रीय रूग्णसंख्या 544 झाली आहे. तर 42 जण केरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
इचलकरंजीतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बळींची संख्या 1 हजार 758 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 855, नगरपालिका क्षेत्रात 350, कोल्हापूर शहरात 390 तर अन्य 163 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 42 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 101 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 65 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 4, भुदरगड 1, चंदगड 1, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 4, कागल 0, करवीर 7, पन्हाळा 0, राधानगरी 2, शाहूवाडी 0, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 10, कोल्हापूर शहरात 27 तर अन्य 7 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी 1226 जणांची तपासणी केली. त्यातील 160 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 544 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 908 अहवालापैकी 797 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 80 अहवाल आले. त्यातील 71 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 245 रिपोर्ट आले. त्यातील 221 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51 हजार 403 आहेत. त्यापैकी 49 हजार 101 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 544 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 253 तर ग्रामीण भागात 87 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण 65 : एकूण : 51403
कोरोनामुक्त 42 : एकूण : 49101
कोरोना मृत्यू : 1 : एकूण मृत्यू : 1758
सक्रीय रूग्ण : 544