प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात रात्री 8 वाजेपर्यत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 80 वर पोहोचली. इचलकरंजी येथे 60 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 26 झाली आहे. जिल्हय़ात शिरोळ, करवीर, गडहिंग्लज, पन्हाळा तालुका आणि कोल्हापूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे.
सकाळी नऊ वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये सांगली जिह्यातील वाळवा येथील 57 वर्षीय पुरुष, कोल्हापूर शहरातील शिवाजी पार्क येथील 46 वर्षीय पुरुष, ताराबाई पार्क येथील 64 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, पंधरा वर्षाची मुलगी, करवीर तालुक्यातील उंचगाव येथील 43 वर्षीय पुरुष, राधानगरी तालुक्यातील धामोड येथील 55 वर्षीय महिला, इचलकरंजीतील कबनूर येथील 54 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दुपारी आलेल्या 25 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शिरोळ तालुक्यातील 8, करवीर तालुक्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे.
दुपारी बारा वाजता आलेल्या 17 पॉझिटिव्हमध्ये शिरोळ तालुक्यातील 8 करवीर तालुक्यातील 7 जण आहेत. यामध्ये शिरोळ तालुक्यातील 23 वर्षीय महिला, तेरा वर्षांची मुलगी, 45 वर्षांची महिला, 38 वर्षीय, 45 वर्षीय पुरुष 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय वृद्ध, वृद्धेंचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यातील 29 वर्षीय तरूण, करवीर तालुक्यातील 29 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय वृद्ध, 48 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला आहे. पन्हाळा तालुक्यातील 61 वर्षीय वृद्धा, 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा आलेल्या आठ पॉझिटिव्ह रुग्णांत करवीर तालुक्यातील केर्ले माने गल्ली येथील 63 वर्षीय वृद्ध, इचलकरंजी येथील 70 वर्षीय वृद्ध, कळंबा येथील 33 वर्षीय पुरुष, दीड वर्षांची बालिका, 56 वर्षीय महिला, आजरा येथील 64 वर्षीय वृद्ध, चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील 47 वर्षीय पुरुष, कोल्हापुरातील जवाहरनगर येथील 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे>
सायंकाळी 16 आणि 17 असे दोन टप्प्यात आणखी 33 रूग्णांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. यामध्ये कुरुंदवाड, कोल्हापूर शहर, करवीर शाहूवाडी तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील 23 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 45 वर्षाची महिला, 38 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय तरूण, 52 वर्षीय महिला, 65 वर्षीय वृद्धांचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यातील वडगाव येथील 29 वर्षीय तरूण, कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट येथील 39 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय वृद्ध, 47 वर्षीय महिला, गंजीमाळ येथील 26 वर्षीय महिला, वारे वसाहत येथील 56 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला, पन्हाळा तालुक्यातील पोखले येथील 61 वर्षीय वृद्ध, शिरोळ तालुक्यातील शिरोळ येथील 40 वर्षीय महिला, पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सायंकाळी सहा वाजता आलेल्या दुसऱया रिपोर्टमध्ये पन्हाळा तालुक्यातील 6, करवीर तालुक्यातील 6, शहरातील 3 आणि शिरोळ तालुक्यातील एकाचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील एक वर्षाचे बालक, पोर्ले येथील 55 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय तरूण, 32 वर्षीय महिला, 10 वर्षांचा मुलगा, 24 वर्षीय पुरुष, करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथील 62 वर्षीय वृद्ध, मार्केट यार्ड येथील 33 वर्षीय पुरुष, करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील 41 वर्षीय महिला, मार्केट यार्ड येथील जयदेवम्मा बिल्डींगमधील 3 वर्षाचे बालक, 28 वर्षांची महिला, 19 वर्षांची महिला, करवीर तालुक्यातील शिंदेवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, केर्ले येथील 62 वर्षीय वृद्धा, 16 वर्षांची तरुणी, गांधीनगरातील कोयना कॉलनी येथील 49 वर्षीय पुरुष, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्हय़ात सायंकाळी 6 वाजता आलेल्या 14 पॉझिटिव्ह रूग्णांत करवीर तालुक्यातील गांधीनगर कोयना कॉलनी येथील 72 वर्षीय वृद्धा, 48 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय पुरूष, कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथील 40 वर्षीय महिला, गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील 37 वर्षीय पुरूष, कौलगे येथील 46 वर्षीय पुरूष, गडहिंग्लज येथील 26 वर्षीय महिला, हेब्बाळ जैद्याळ येथील 35 वर्षीय पुरूष, 2 वर्षांचे बालक, शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील 65 वर्षीय वृद्ध आणि 14 वर्षीय मुलगा, इचलकरंजी येथील चांदणी चौकातील 70 वर्षीय वृद्ध, लाखेनगर येथील 60 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.
रात्री 8 पर्यतची कोरोना रूग्णांची आकडेवारी
पन्हाळा ः 8
गडहिंग्लज ः 6
करवीर ः 13
कोल्हापूर शहर ः 11
शिरोळ ः 12
हातकणंगले ः 6
शाहूवाडी ः 1
आजअखेर 852 जण कोरोनामुक्त ः डॉ. केम्पीपाटील
सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 405 प्राप्त अहवालापैकी 380 निगेटिव्ह तर 16 पॉझिटिव्ह आहेत. जिह्यात आजअखेर 1 हजार 252 पॉझिटिव्हपैकी 852 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 375 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी सोमवारी दिली.
सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 16 पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरा 1, चंदगड 1, हातकणंगले 1, करवीर 2, राधानगरी 1, नगरपालिका क्षेत्र 1, महापालिका क्षेत्र 8 व इतर जिल्हा व राज्य 1 असा समावेश आहे.
आजअखेरतालुका, नगरपालिका, महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा- 96, भुदरगड- 80, चंदगड- 154, गडहिंग्लज- 127, गगनबावडा- 7, हातकणंगले- 26, कागल- 59, करवीर- 67, पन्हाळा- 42, राधानगरी- 75, शाहूवाडी- 191, शिरोळ- 24, नगरपरिषद क्षेत्र- 164, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-112 असे एकूण1224आणि जिल्हा व राज्यातील 28 असे मिळून एकूण 1252 रुग्णांची आजअखेर जिह्यात संख्या आहे.
जिह्यातील एकूण 1317 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 859 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिह्यातील रूग्णांची संख्या 432 इतकी आहे.