प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात रविवारी कोरोनाने दोन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत कोरोनाने 10 जणांचा बळी घेतला. गेल्या 24 तासांत 367 नवे रूग्ण दिसून आले यामध्ये शहरातील 177 रूग्ण आहेत. दिवसभरात 116 जण केरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 2 हजार 210 झाली आहे. जिल्हय़ात विकएंड लॉकडाऊननंतरही कोरोना रूग्णसंख्येचा आलेख वाढतच आहे. शहरातील होम कोरोंटाईनचा आकडा 500 कडे सरकत आहे. तर ग्रामीण भागात साडेआठशेपेक्षा अधिक रूग्ण होम कोरोंटाईन झाले आहेत.
जिल्हय़ात रविवारी शहरातील शुक्रवार पेठेतील 60 वर्षीय पुरूषाचा सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील 65 वर्षीय पुरूष, पन्हाळा तालुक्यातील नावली येथील 70 वर्षीय महिलेचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये सांगली जिल्हय़ातील मिरज माळगाव येथील 79 वर्षीय पुरूष, इचलकरंजी येथील 79 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नागाळा पार्क येथील खासगी हॉस्पिटलमध्ये रत्नागिरी जिल्हय़ातील केळवली (ता. राजापूर) येथील 72 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शनिवारी कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. कोरोनाने 2 दिवसांत 10 जणांचा बळी घेतला आहे. जिल्हय़ात आजपर्यत कोरोनाने 1 हजार 812 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागातील 875, नगरपालिका क्षेत्रात 355, कोल्हापूर शहरात 409 तर अन्य 173 जण आहेत रविवारी 116 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 50 हजार 373 झाली आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 367 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 9, चंदगड 10, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 29, कागल 9, करवीर 23, पन्हाळा 13, राधानगरी 8, शाहूवाडी 9, शिरोळ 5, नगरपालिका क्षेत्रात 57 कोल्हापुरात 177 तर अन्य 17 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 54 हजार 395 झाली आहे. दिवसभरात 622 जणांची तपासणी केली. त्यातील 252 जणांची अँटीजेन टेस्ट केली. शहरात 430 तर ग्रामीण भागात 855 जणांना होम कोरोंटाईन केले आहे.
शेंडा पार्क येथून रविवारी आलेल्या 2 हजार 886 अहवालापैकी 2 हजार 573 निगेटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टचे 201 अहवाल आले. त्यातील 164 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 746 रिपोर्ट आले. त्यातील 591 निगेटिव्ह आहेत. सध्या 2 हजार 210 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाŸ. अनील माळी यांनी दिली.
Previous Articleपाटगांव परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात २५० केंद्रांवर लसीकरण सुरू
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.