जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 67 वर
सीपीआरमधील कर्मचारी, राधानगरी, आजरा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील पॉझिटिव्ह रूग्ण, शहरातील चार महिलांचा समावेश
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी आरोग्य कर्मचारी, शहरातील तीन महिला, तसेच आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील 17 जण पॉझिटिव्ह आले. रविवारी रात्री राजारामपुरीतील महिला पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी राजारामपुरीतील शाहूनगर परिसर इतरांसाठी प्रतिबंधित करण्यात आला. दरम्यान, जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 67 वर पोहोचली आहे.
येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी रात्री उशिरा मिळालेल्या 6 पॉझिटिव्ह रूग्णांत चार महिलांसह दोघांचा समावेश आहे. महिलांमध्ये 38 वर्षीय, 25 वर्षीय, 63 वर्षीय महिला आणि 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. तसेच 38 आणि 17 वर्षाच्या तरूणाचा समावेश आहे. सोमवारी सकाळी पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये सीपीआरमधील एक अधिकारी, आजरा तालुक्यातील खालेवाडी येथील आणि पन्हाळा तालुक्यातील पुंभारवाडी येथील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. दुपारी शाहूवाडी तालुक्यातील म्हालसवडे येथील दांपत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सायंकाळपर्यत पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 57 वर पोहोचली.
पन्हाळा तालुक्यातील पोंबरे येथील तरूण पुणे येथून आला आहे. चेंबुर मुंबई येथून राधानगरी तालुक्यातील दांपत्य, वरळी मुंबई येथून आजरा तालुक्यातील दांपत्य तसेच मुंबई येथून शाहूवाडी तालुक्यातील पणुंब्रेपैकी म्हालसवडे येथील दांपत्य जिल्हय़ात आले. या सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. रविवारी रात्री उशिरा आलेल्या सहा पॉझिटिव्ह रूग्णांत सांताप्रुझ मुंबई येथून आलेले भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक येथील दांपत्य, मुंबई येथून आलेले राधानगरी तालुक्यातील गारिवडे येथील दांपत्य, मुंबईहून आलेला पन्हाळा तालुक्यातील पिंपळे येथील तरूण आणि शहरातील राजारामपुरीतील शाहूनगर परिसरात साताऱयाहून आलेल्या महिलेचा समावेश आहे.
राजारामपुरीतील शाहूनगर परिसर कंटेनमेंट घोषित
राजारामपुरी परिसरातील शाहूनगर येथील 26 वर्षीय विवाहिता लॉकडाऊनपुर्वी सातारा येथे माहेरी गेली होती. चार दिवसांपुर्वी रात्री ती पतीसमवेत कोल्हापुरात आली होती. तिचा स्वॅब घेतला होता. रविवारी रात्री उशिरा ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोमवारी ती रहात असलेला 300 मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. तिच्या पतीसह पुटुंबातील 14 जणांना कोरोंटाईन करण्यात आले. परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिवसभर औषध फवारणी मोहीम राबवली.
दिवसभरात 532 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
सीपीआर हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळपर्यत 253 जणांची तपासणी करण्यात आली. नवीन 10 रूग्ण आढळले. 244 जणांना आयसोलेटेड वॉर्डमध्ये दाखल केले. सोमवारी 481 स्वॅबपैकी 140 जणांचे रिपोर्ट मिळाले. त्यातील 129 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. सीपीआरमध्ये 54 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 12 डिसचार्ज झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. 24 दाखल असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच 11 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 1 जैसलमेर राजस्थान येथील आहे. सायंकाळपर्यत आणखी दोन पॉझिटिव्ह आढळले. ते शाहूवाडी तालुक्यातील आहेत. दिवसभरात 501 रूग्णांची तपासणी झाली. 9 रूग्ण आढळले तर 254 जण उपचार घेत आहेत. आतापर्यत 405 स्वॅबचे रिपोर्ट मिळाले. त्यापैकी 403 निगेटिव्ह असून 2 पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्हंपैकी 1 सीपीआरमध्ये तर चौघांना राधानगरीत कोरोंटाईन केले आहे.
राजारामपुरी, कावळा नाका, जवाहरनगर परिसरात पाच पॉझिटिव्ह
राजारामपुरी शाहूनगर येथील महिला पॉझिटिव्ह आल्यानंतर हा 300 मीटरचा परिसर प्रतिबंधित केला आहे. कावळा नाका, ताराराणी चौकाच्या पुर्वेकडील वसाहतीतील तीन आणि जवाहरनगर येथील एक पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात पाच जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
तपासणी सुरू असताना संशयिताचा मृत्यू
पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथील एकाच कुटुंबातील 10 जण मुंबई येथून कोल्हापुरात आले. शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांची कोरोना तपासणी झाली. तपासणी दरम्यान चंद्रकांत पाटील (वय 38) याचा मृत्यू झाला. त्यांच्या स्वॅबचा रिपोर्ट आलेला नाही, अशी माहिती सरपंच फुलाजी पाटील यांनी दिली.