प्रतिनिधी / कोल्हापूर
पुणे येथील विभागीय डेट आडीट कमिटीने शनिवारी सीपीआर हॉसपिटलला भेट दिली.
पुणे येथील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजचे डॉ. दिलीप कदम आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभाग प्रमुख डॉ. आरती किन्हेकर या दोन सदस्य समितीने सीपीआर ला भेट दिली या भेटीत डेथ ऑडिट कमिटीने प्रत्येक वॉडची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या. जिह्यात कोरोनाचे वाढलेले मृत्यू त्याची कारणे आणि उपाय योजनांचा आढावा या समितीने घेतला. जिह्यात कोरोना मृत्यूची संख्या 500 पर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी झालेल्या 140 कोरोना मृत्यूची चौकशी डेथ ऑडिट कमिटीने केली होती. त्यामध्ये 85 टक्के मृत्यू इतर आजाराने झाले होते, त्याला कोरोनाही कारण होते. त्यानंतर गेल्या दीड महिन्यात कौरोना मृत्यूची संख्या वाढत गेली. शुक्रवारी ती 496 वर पोचली होती.
दरम्यान, पुणे येथील डॉ. कदम आणि डॉ. किनहीकर यांच्या विभागीय डेट कमिटीने सितार मध्ये आढावा घेतल्यानंतर सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत जिह्यातील वाढलेला कोरोना मृत्युदर कसा कमी करता येईल त्यासाठी औषध उपचार काय करायचे आणि कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर काय औषध उपचार करावेत, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले दोन तास पाहणी आणि दोन तास मार्गदर्शन अशी चार तास कमिटी सीपीआर मध्ये होती. कोरोनामुळे मृत्यू त्यांच्यावर झालेली उपचार आणि त्यातील त्रुटी जाती याची माहिती समितीने घेतली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हृदय रोग, उरोरोग भूलतज्ञ विभागातील डॉक्टरांची चर्चा केली.तसेच कोरोनाचा मृत्यू दर कमी येण्यासाठी काय करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले.या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बी सी केमपीपाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के डॉ. मिसाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजस्विनी सांगरूळकर आदी उपस्थित होते.