वार्ताहर/गोकुळ शिरगाव
तीन पाणी पत्ते पैसे लावून खेळणाऱ्या जुगार अड्यावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी जुगावर खेळणार्या सात जणांना ताब्यात त्यांच्याकडून 11 लाख 43 हजार रुपये मुद्देमाल जप्त केला. तर या सात जणांवर गुन्हा दाखल केला. पुणे बेंगलोर महामार्गावर कन्हेरवाडी येथील असलेल्या जर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे टेकडीवर जुगार खेळणार्यावर आज, शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
संजय नारायण काशीद (वय-52 रा.तेली गल्ली, कोल्हापूर), सुनील तात्यासो देशपांडे (31 रा. सुळकुड ता. .कागल), नेकअहमद जैजुल पांगारे (42 रा. शिरोली ता. हातकणंगले), विनायक वसंत कोठावळे (40, रा.मजले ता. हातकणंगले), शक्ती दिलीप माळुंगे (38, रा. मोरेवाडी ता. करवीर), दादासो अंबादास माने (48, रा.उंचगाव ता. करवीर), मदन बंडू घोडके (50, रा. कागल) अशी या अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुणे बेंगलोर महामार्गावर कनेरवाडी हद्दीतील जाजल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या टेकडीवर दादासो अंबादास माने यांचे बांधकाम चालू असलेल्या घरांमध्ये हा खेळ चालू होता. गोकुळ शिरगाव पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून या सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे. या घटनेची फिर्याद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल बाजीराव पवार यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार बी.एम.तळेवाडीकर करीत करीत आहेत.