प्रतिनिधी / सुधाकर काशीद
पापाच्या तिकटीला सूर्यकांत हॉटेल आहे. मिरची भजी कांदा भजीसाठी प्रसिद्ध या हॉटेलच्या दारात थांबलेली असते. आणि तिला रस्त्यावरून पाहण्यासाठी लोकांची हमखास गर्दी होते. जुने त सोने ही म्हण ठरवणारी ही मोटार या सूर्यकांत हॉटेलच्या मालकांची. जसे त्यांचे हॉटेल जुने असूनही गर्दी तशी त्यांची मोटार जुनी असूनही या मोटारी भोवती कायम हवशा नवशांची गर्दी.
कोल्हापुरातल्या सुस्थितीतल्या जुन्या मोटारी पैकी हि एक मोटार. सुर्यकांत हॉटेलचे मालक परशुराम पाटील यांनी केवळ 3600 रुपयात त्या काळात ही मोटर घेतली. ही मूळ मोटार त्या काळातले प्रख्यात हार्डवेअर चे व्यापारी इनायत हुसेन मणेर यांची. पाटील यांनी ती घेतली आणि 1985 पर्यंत व्यवस्थित वापरली. त्यांचे निधन झाले. आणि त्यानंतर जवळ जवळ तेरा वर्ष भंगार अवस्थेत ही मोटर त्यांच्या घराच्या आवारात पडून राहिली. पण त्यांचे चिरंजीव प्रकाश पाटील व परिवारातील सर्व भावंडांनी या मोटारीला अगदी ठरवून पुन्हा पुनर्जन्म दिला. कोल्हापूर म्हणजे मिस्त्री लोकांचे माहेरघरच. त्यामुळे वसंत गवळी व अब्दुल मीर शिकारी या मेस्त्राrनी या मोटारीला पुनर्जन्म दिला. इकडचा तिकडचा पार्ट न वापरता सर्व पार्ट ओरिजनल वापरले स्टेरिंगचे बेरिंग इथे कोठे मिळत नव्हते. त्यामुळे परदेशातून ते मागून घेतले व या मोटारीला खणखणीत स्थितीत त्यांनी रस्त्यावर आणले.
या मोटारीला पितळेचा आणि तांब्याचा खूप वापर आहे. मोटर बंद पडली तर हँडल मारून सुरू करण्याची सोय आहे. मोटारीला रबरी फुग्याचा ओरिजनल पाँम पाँम वाजणारा हॉर्न आहे. त्याचा सूर बिघडला तर तो पुण्यातून दुरुस्त करून आणला जातो. ही मोटार इतकी देखणी आहे की, अनेक जण कोरा चेक देऊन मोटारीची मागणी करतात. पण पाटील परिवाराचा या मोटारीवर इतका जीव की, 22 जणांच्या पाटील परिवारात तेविसावा सदस्य म्हणून या मोटारीला मान आहे. गणेश चतुर्थीला घरातील गणपती ते याच मोटारीतून वाजत गाजत आणतात. घरातल्या विवाह समारंभासाठी ही मोटर वापरतात. चिमणराव गुंडाभाऊ, दाम करी काम, हयोच नवरा पाहिजे ,चटक चांदणी या मराठी चित्रपटात ही मोटार काही दृश्यात वापरली आहे.
म्हटलं तर ही मोटार म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार आहे. पण पाटील परिवाराच्या दृष्टीने हौसेला मोल नसते. आता तिसर्या पिढीतील युवराज पाटील मोटारीचा मेंटेनन्स नियमित प हातात. ही मोटार आपल्या पाटील परिवाराची शान आहे च, पण ती कोल्हापूरचीही एक शान, असे पाटील परिवार मानतो. व कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्ती सारखा या मोटारीला कायम जपतो.