आगीत सुमारे सहा लाखाचे नुकसान
वार्ताहर / पाटगांव
भुदरगड तालुक्यातील वासनोली पैकी जोगेवाडी येथील एकनाथ डवरी यांच्या जनावराच्या गोठ्याला अचानक आग लागून सुमारे सहा लाखाचे नुकसान झाले आहे. आगीमध्ये सहा म्हैशीचा होरपळून मृत्यू झाला असून ही घटना शनिवार दिनांक ३ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली. यात जनावरांचा चारा व इतर शेतीचे साहित्य जळून गेल्याने शेतकर्याचे सहा लाखाचे नुकसान झाले.
एकनाथ नाथा डवरी यांचा घराशेजारीच जनावरांचा गोठा आहे शनिवारी रात्री अकरा वाजता गोठयास अचानक आग लागली हि बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर आग विझवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले; मात्र आगीचे स्वरूप भीषण असल्याने यामध्ये सहा दुभत्या आणि गाभण म्हैसी व शेतीसाहित्य जळून खाक झाले. याबाबत तलाठी एकनाथ मिसाळ, मानसिंग पाटील, बाजीराव चव्हाण, केरबा पोवार आदिनाथ पोवार यांनी पंचनामा केला घटना स्थळी माजी सभापती यशवंत नांदेकर, सरपंच नंदा पाटील यांनी पाहणी केली