प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली महिनाभर बंद असलेल्या जिल्हा परिषदेतील कामकाज उद्या, सोमवार 4 मे पासून पूर्ववत सुरु होणार आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या कार्यालयात कर्मचाऱयांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मित्तल यांनी केले आहे. गंभीर आजाराचा पूर्व इतिहास असणारे व सध्या संबंधित आजारांचे उपचार घेत असलेले अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात अनुपस्थित राहनेस सवलत देणेत येत आहे.
यांना मिळणार सवलत
मधुमेह/डायबेटीज
उच्च रक्तदाब
जुनाट किडनीचे आजार
जुनाट फुफ्फुसां विषयक आजार जसे दमा/ श्वसनवह संस्थेमध्ये अडथळय़ांमुळे होणारे आजार
जुनाट यकृताचे/लिवरचे आजार
कर्करोग असणारे व किमोथेरपी सूर असणारे
अधिक कालावधीसाठी स्टिरॉइड्स औषधे घेत असलेले कर्मचारी
जुनाट आजाराने अंथरुणावर खिळून असलेल्या व्यक्ती, जसे पक्षाघात इत्यादी