कोवाड / वार्ताहर
कोवाड ता. चंदगड येथे ताम्रपर्णी नदीला पूर येऊन पहाटे नदीचे पाणी बाझार पेठेत शिरल्याने बाझार पेठेतील व्यापारी वर्गाची दैना उडाली. तर नदी काठला लागून असलेल्या घरातून ही आकस्मिक पाणी शिरल्याने अनेकांची अक्षरक्ष: झोप उडाली
सोमवारीपासून मुसळधार पाऊस झाल्याने कोवाडकरांची बुधवारची पहाट पुराने सुरु झाली. गतसाली ही याच तारखेला कोल्हापुरात महापूर आला होता. शेकडो दुकानदारांची, घरांची अक्षरक्ष: वाताहात झाली होती. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले होते. आज होत आलेल्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आधीच कोरोनाची धास्ती त्यात आता महापूराची चाहूल यामूळे कोवाड परीसर भितीने धास्तावला आहे.
दरम्यान कोवाड परिसरात शेतीची शिवारे पाण्याने तूडूंब भरली आहेत. वादळी वाऱ्याने ऊस पिके भूईसपाट झाली आहेत. त्यामूळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.