जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचा पालकमंत्र्यांना टोला
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नेत्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. रात्रीचा दिवस करून सर्वच नेते कामाला लागले आहेत. सत्ताधारी गटाच्या वतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दुपारच्या सत्रातील भेटीगाठी सुरू ठेवले हाच धागा पकडत पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांची दुपारची झोप उडाली आहे असा टोला महाडिक यांचे नाव न घेता लगावला होता. यावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी तिखट शब्दात समाचार घेतला.
आमची दुपारची झोप उडाली नसून त्यांना रात्रीची झोप लागेना झाले झाली आहे. गोकुळच्या सत्तेचे स्वप्न, त्यांना अस्वस्थ करून टाकले आहे अशा शब्दात पलटवार केला ते गेले दहा वर्षे महाडिक यांच्यासोबत होते त्यामुळे आप्पांच्या सवयी त्यांना चांगलेच माहित आहेत. आमदार पी. एन. पाटील, नरके आणि महाडिक यांनी शेतकरी हिताचा कारभार केल्यामुळे गोकुळ मध्ये सत्ता परिवर्तनाचे त्यांचे स्वप्न भंगणार आहे असा टोला ही लगावला. त्या अर्ज दाखल करण्यासाठी प्रांत कार्यालयात आल्या असता प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.