प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज रविवारी 19 डिसेंबर होणार आहे. आर. के. नगर-मोरेवाडी येथील हॉल क्रमांक 5 मध्ये सकाळी दहा वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गोकुळच्या संचालक शौमिका महाडिक, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील आदी नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. हे नेते या मेळाव्यात नेमके काय बोलणार? याकडेही जिल्हÎातील राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
भविष्याचे शिलेदार आणि साक्षीदार बनुया अन् मिशन 2024
2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालिन भाजप आमदार अमल महाडिक यांना पराभूत करत पालकमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत प्रवेश केला. भाजप आणि महाडिक परिवारासाठी तो धक्कादायक पराभव होता. त्यामुळे भाजप आणि महाडिक परिवाराने 2024 ची विधानसभा निवडणूक डोळÎासमोर ठेवून नियोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या मेळाव्याकडे पाहिले जात आहे. `दक्षिण मतदारसंघाच्या गौरवशाली भविष्याचे शिलेदार व साक्षीदार बनुया’, मिशन 2024 अशी टॅगलाईन घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर या मेळाव्याचा प्रचार आणि उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.