शिरोली पोलिसांकडून चार लाख २१ हजार रुपयांची मदत
वार्ताहर / पुलाची शिरोली
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यातील दिवंगत संजित विलासराव जगताप पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या कुटुंबाला शिरोली पोलीसांकडून चार लाख २१ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. संजीत जगताप हे कोरोनाविषाणू संसर्गामुळे संजय घोडावत कोरोना सेंटर येथे उपचार घेत असताना मयत झाले होते.
जगताप यांचे कुटुंबियांना शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे कडील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून 1,01,000/- रूपये तसेच गांधीनगर पोलीस स्टेशनकडून 40,000/- रुपये अशी रक्कम सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदत करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे शिरोली पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसीमधील मेनन ग्रुप, सरोज कास्टिंग, यश मेटॅलिक्स व इतर कंपनी तसेच शोरूम व शिरोली, टोप, भुये या ग्रामपंचायतकडून आर्थिक मदत करण्यात आलेली आहे.
अशी एकूण 4,21,000/- रुपये दिवंगत संजीत जगताप यांची पत्नी व मुले यांचेकडे तिरुपती काकडे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, डॉ. प्रशांत अमृतकर उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर, किरण भोसले सहा पोलीस निरीक्षक व अतुल लोखंडे पोलीस उपनिरीक्षक शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन तसेच इतर पदाधिकारी तसेच पोलीस स्टेशन कडील कर्मचारीवर्ग यांचे उपस्थित आर्थिक मदत देण्यात आली आहे.