साके येथील शिवशक्ती दुध संस्थेमार्फत उत्पादकांना बोनस, भेटवस्तूचे वाटप
व्हनाळी / वार्ताहर
ग्रामिण भागात शेतक-यांनी शेतीला पुरक असलेल्या दुग्ध व्यवसायात अधुनिक तंत्रज्ञान वापरून व्यवसाय करण्यास सुरूवात केल्यामुळे ग्रामिण अर्थव्यवस्था उंचावत आहे. शिवाय आदर्श कारभार वेळेत दुध उत्पादकांना बिले आदा केल्यामुळे दुधसंस्था देखील नफ्यात असल्याने मिळणा-या संस्थेच्या ऩफ्यातून उत्पादक सभासदांना दरवर्षी बोनस, वस्तू वाटप केले जाते. इतर व्यवसायाच्या तुलनेत दुध उत्पनातून मिळालेल्या नफ्यातून शेतक-यांची आर्थिक प्रगीत होत असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच,चेअरमन चंद्रकांत परसू निऊंगरे यांनी केले. साके ता.कागल येथील शिवशक्ती दुध संस्थेमार्फत उत्पादकांना दिपावली भेटवस्तू वाटप प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मारूती श्रीपती निऊंगरे होते
यावेळी संस्थेच्या दुध उत्पादकांना दिपावलीनिमित्त फरक रक्कम 2 लाख,24 हजार रूपये तसेच स्टीलची बादली,साबन,तेल आदी भेटवस्तूंचे वाटप व्हा. चेअरमन सैा. वंदना आगळे यांचे हस्ते संचालकांच्या उपस्थीत करण्यात आले. यावेळी बाळासो ज्ञा. निऊंगरे,बाबुराव निऊंगरे,सातप्पा तुरंबे,धनाजी पाटील,मारूती हरी ससे, डि.बी.निऊंगरे,भिकाजी पोवार,बाजी निऊंगरे, सैा,सुमन खराडे,सुजाता वाईंगडे,सविता खराडे,रमेश पाटील,परसू वाईंगडे आदी सभासद उत्पादक उपस्थीत होते. स्वागत डॅा.तानाजी निऊंगरे यांनी केले तर आभार सचिव महादेव निऊंगरे यांनी मानले.