सांगरुळ/वार्ताहर
करवीर तालुक्यातील स्वयंभुवाडी–आमशी मार्गावर दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत दोघेजण जखमी झाले आहेत. वैभव भिवाजी सुळेकर (रा. पासार्डे, ता करवीर), प्रदीप रघुनाथ माळी (रा. सांगरुळ, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत. आज, रविवार (दि.2) सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
स्वयंभुवाडी येथून देवदर्शन घेऊन सांगरुळकडे जाणारी दुचाकी क्रमांक (MH-09-EW-9934) आणि स्वयंभूवाडीकडे निघालेल्या दुचाकी क्रमांक (MH-09-7147) ची बोलोली पासून पुढे काही अंतरावर असलेल्या वळणावर समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोघे जण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.