प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. गेल्या 24 तासांत 10 नवे रूग्ण दिसून आले तर 40 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 1 हजार 301 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नोंद झालेला नाही. आजपर्यत कोरोनाने 1,676 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 831, नगरपालिका क्षेत्रात 340, शहरात 361 तर अन्य जिल्ह्यातील 144 जणांचा समावेश आहे. सध्या 450 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 1 हजार 301 जणांची तपासणी केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून शुक्रवारी 724 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 723 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 139 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 175 रिपोर्ट आले, त्यापैकी 166 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 1, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 1, पन्हाळा 0, राधानगरी 1, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 5 अन्य 1 असे 10 रूग्ण असल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.