जिल्ह्यातील अंध विद्यार्थ्यांना सह्यगिरीची शैक्षणिक मदत
प्रतिनिधी / गगनबावडा
अंध साहाय्यता दिन व पांढरी काठी सप्ताहानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण अंध विद्यार्थ्यांना गगनबावडा तालुक्यातील सह्यगिरी संस्थेने शैक्षणिक पालकत्व उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य व अंधांसाठीची पांढरी काठी व अन्य वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ विभागीय शाखा पुणे व जिल्हा शाखा कोल्हापूर आणि सह्यगिरी यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने कोल्हापूर येथील विद्या भवन येथे जागतिक अंध सहाय्यता दिन अर्थात पांढरी काठी सप्ताह साजरा करण्यात आला होता .या कार्यक्रमात सह्यगिरी संस्थेच्या वतीने इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये अंध असूनसुद्धा गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शैक्षणिक साहित्य व अंधांसाठी ची पांढरी काठी वितरण करण्यात आली.
दृष्टिहीन असूनसुद्धा संपुर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या सदस्यांनी केले याबाबतीत त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच. अशाच प्रेरणादायी विचारातून आणि कृतीतून सह्यगिरी संस्था सामाजिक कार्य करत आहे. आम्ही सर्व सह्यगिरी सदस्य साक्षीदार झालो याचा आम्हाला नितांत अभिमान असल्याचे मत सह्यगिरी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी व्यक्त केले व्ही. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दृष्टिहीन संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड होते. कोल्हापूर विभागाचे महासचिव शरद पाटील सह्यगिरी परिवारातील संजय सुतार, प्राध्यापक धैर्यशील नाईक, संस्थेचे संचालक संभाजी कांबळे तानाजी तेली, रखमाजी पाटील, अमोल जोगदंड बाबुराव निकम, डी. जाधव आदी उपस्थित होते.