दोन्ही डोस लाभार्थ्यांची संख्या साडेतेरा लाख, 6,91,282 पुरूष, 6,77,151 महिलांना लस,
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यात लोकसंख्येच्या घनतेनुसार लसीकरणात कोल्हापूर आजही आघाडीवर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत साडेतेरा लाख लाभार्थ्यांनी दोन्ही डोस मिळाले आहेत. यामध्ये महिला अन् पुरूषांची संख्या प्रत्येकी 50 टक्क्यांइतकी आहे. पुरूषांबरोबर महिलांनी लसीकरणात बरोबरी साधली आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
डॉ. देसाई म्हणाले, कोरोना लसीकरणात जिल्हा आघाडीवर आहे. लसीचे दोन्ही डोस घेणाऱया लाभार्थ्यांची संख्या साडेतेरा लांखाहून अधिक आहे. त्यात पुरुषांची संख्या अधिक असली तरी महिलांनीही लसीकरणात पुरुषांची बरोबरी साधली आहे. जिल्ह्यात आजपर्यत 6 लाख 91 हजार 282 पुरुष आणि 6 लाख 77 हजार 151 महिलांनी दोन्ही डोस घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच शहरासह जिह्यात आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणावर अधिक भर दिला आहे. त्याला चांगल्या प्रकारे यश आले आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरु लागली आहे. राज्याच्या इतर जिह्याच्या तुलनेत जिह्याने लसीकरणात बाजी मारली आहे. जिह्याला 31 लाख 26 हजार 917 लाभार्थ्यांचे उदिष्ट आहे. आतापर्यंत 10 लाख 77 हजार 68 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 94 हजार 80 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीचा तुटवडा असल्याने जिह्यातील लसीकरणावर त्याचा परिणाम झाला आहे. जिह्यात आतापर्यंत कोरोनाचा पहिला, दुसरा डोस घेतलेल्यांत साडेतेरा लाख लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये 6 लाख 91 हजार 282 पुरुष तर 6 लाख 77 हजार 151 इतक्या महिला आहेत.
परदेशी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, दिव्यांग आणि तृतीयपंथियांना लस देण्यात जिह्याने आघाडी घेतली आहे. तसेच 45 वर्षावरील लाभार्थी लसीकरणातही राज्यात जिल्हा आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली 57 टक्के, सिंधुदुर्ग 52 टक्के तर सर्वाधिक कमी रत्नागिरी जिह्यात 30 टक्के लसीकरण झाले आहे. कोल्हापूर जिह्याने 65 टक्के इतके उचांकी लसीकरण केले आहे. केंद्र शासनाकडून मोठÎा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास 18 वर्षावरील वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही डॉ. देसाई यांनी दिली.