ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांमध्ये यश
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील डॉ स्मिता गोरखनाथ माने यांनी कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाड येथे ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांमध्ये पीएचडी संपादन केली आहे, या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे,
शिरोळ येथील स्मिता माने यांचे प्राथमिक शिक्षण जे. जे. मगदूम विद्यालयात झाले असून महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर कॉलेज येथे झाले आहे, त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी माध्यममधील बीएड पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले ,त्यानंतर नुकतेच त्यांनी कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथे एम एस सी शिक्षणाबरोबरच पी एचडी संपादन केली आहे,
यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये मेडिसिनल विषयात विशेष संशोधन केल्याबद्दल स्मिता माने यांना इंटरनॅशनल रिसर्च हा आंतरराष्ट्रीय अवॉर्डही मिळाला आहे, ऑरगॅनिक केमिस्ट्री ही पीएचडी संपादन करण्यासाठी प्रोफेसर डॉ के एस कटगी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तसेच या कामी पती अजय रामदुर्ग व वडील माजी सरपंच गोरखनाथ माने यांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले