गणपती बाप्पा मोरया पुढच्या, वर्षी लवकर” या च्या गजरात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन
ग्रामपंचायत नरंदे ने पर्यावरण पूरक विसर्जनाची केली सोय
नरंदे / वार्ताहर
तीन दिवस माहेरी कोडकौतुक करून घेऊन, गोडाधोडाचे खाऊन आज गुरुवारी गौराई आपल्या घरी परतल्या. माहेरवाशीण गौराईला आणि तिच्यासोबत गणपती बाप्पालाही निरोप देण्यासाठी गणेशभक्त सोशल डिस्टनिंगचे नियम पाळत विसर्जन करत आहेत . गणपती बाप्पा मोरया ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करतच गणेशभक्तांनी गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप दिला.
घरगुती गौरी, गणपती, निर्माल्य यांचे नदी विहिरीत विसर्जन केल्याने मोठ्या प्रमाणात त्यातील पाणी दूषित होते म्हणून नरंदे ग्रामपंचायतीच्या वतीने यावर्षीही नरंदे ग्रामपंचायतीसमोर मोठ्या कुंडात गणेशमूर्ती विसर्जनाची सोय केली आहे. ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सहाव्या दिवशी घरगुती गणपती व गौरींचे विसर्जन इथे केले जात आहे.