32 बळी, 1376 नवे रूग्ण, 1148 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 376 नवे रूग्ण आढळून आले. नव्या रूग्णांत घट झाली असली तरी सक्रीय रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 976 झाली आहे. दिवसभरात कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 148 जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 683 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 504, नगरपालिका क्षेत्रात 692, शहरात 965 तर अन्य 522 आहेत. दिवसभरात 1 हजार 148 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 37 हजार 673 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 376 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 37, भुदरगड 24, चंदगड 20, गडहिंग्लज 30, गगनबावडा 4, हातकणंगले 126, कागल 58, करवीर 304, पन्हाळा 76, राधानगरी 34, शाहूवाडी 48, शिरोळ 80, नगरपालिका क्षेत्रात 116, कोल्हापुरात 411 तर अन्य 20 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 54 हजार 332 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून सोमवारी 14 हजार 510 अहवाल आले. त्यापैकी 13 हजार 134 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 4 हजार 220 अहवाल आले. त्यातील 3 हजार 886 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 9 हजार 219 अहवाल आले. त्यातील 8 हजार 640 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 71 रिपोर्ट आले. त्यातील 608 निगेटिव्ह आहेत.
परजिल्ह्यातील 3 तर शहरातील 6 जणांचा मृत्यू
परजिल्ह्यातील बेळगावमधील दोन आणि नांदेड येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये शिवाजी पेठेतील तिघांचा तर ताराबाई पार्क, भोसलेवाडी, महावीरनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
टेस्ट संख्या पॉझिटिव्ह रूग्ण
आरटीपीसीआर टेस्ट 4220 334
ऍटीजेन टेस्ट 9219 579
ट्रुनेट टेस्ट 1071 608
एकूण टेस्ट 14510 1376
कोरोना रूग्ण 1376 : एकूण : 1,54,332
कोरोनामुक्त 1148 : एकूण : 1,37,673
कोरोना मृत्यू 32 : एकूण मृत्यू : 4683
सक्रीय रूग्ण : 11976