तोरस्कार चौकातील वसंतराव मेस्त्री यांचे वृद्धापकाळाने निधन
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात ज्या काळी नद्यांवर पूल नव्हते, त्या काळात लाकडी नाव तयार करून ग्रामीण भागातील दोन गावांना आणि गावकऱयांना जोडण्याचे काम करणारे प्रसिद्ध कारागिर आणि तोरस्कर चौक जुना बुधवार पेठ येथील प्रसिद्ध नावेच्या कारखान्याचे मालक वसंतराव गुंडोपंत मेस्त्राr (वय 92) यांचे वृद्धापकाळाने सोमवार 1 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भावगीत, भक्तीगीत गायक राम मेस्त्राr यांचे ते वडील होत.
नव्वदच्या दशकाच्या शेवटापर्यंत कोल्हापूर जिल्हय़ात अनेक नद्यांवर पूल नव्हते. त्यामुळे पूर्वीचे लोकबोर्ड आणि नंतरच्या जिल्हा परिषदेच्या मार्फत नदी पार करण्यासाठी लाकडी नाव दिल्या जात. त्या तयार करण्याचे काम वसंतराव मेस्त्राr यांनी केले. नाव तयार केल्यानंतर त्याची देखभाल, दुरूस्तीही मेस्त्राr करत असत. जिल्हा परिषदेतील सर्व फर्निचरही त्यांनी केले होते. मेस्त्राr यांचे मूळ गाव कोकणातील पावसजवळील नेरवी. मेस्त्राr घराणे हातखंबा येथे आले. राजर्षी शाहू महाराजांच्या निमंत्रणावरून वसंतराव मेस्त्राr यांचे आजोबा भला मेस्त्राr आणि वडील गुंडोपंत मेस्त्राr यांच्यासह कोल्हापुरात आले. त्यांनी शाहूकाळात लाकडी नाव जोडण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पुढे गुंडोपंत आणि नंतर वसंतराव मेस्त्राr यांनी ते काम सुरू ठेवले. नव्वदच्या दशकानंतर पूल झाल्याने लाकडी नावेचा वापर बंद झाला. त्यामुळे मेस्त्राr फर्निचर व कोरीव कामाकडे वळले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा सुरेश यांचे अकस्मिक निधन झाले होते.