राधानगरी / प्रतिनिधी :
निपाणी -राधानगरी रस्त्यावर खोराटे विद्यालयाजवळ स्प्लेंडर मोटारसायकल आणि एसटीचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार झाल्याचे समजते. मोटरसायकलचा चालक आणि मागे बसलेली वृध्दा जागीच ठार झाले असून दोन्ही मयत कुरणी भडगावचे असल्याचे समजते.