नूल / वार्ताहर
सीमाभागातील असंख्य भक्ताचे श्रध्दास्थान असणारे नूलमधील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती श्री उपाचार्यरत्न चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता महानिर्वाण झाले. ही बातमी समजताच नूलसह सीमाभागात भक्तामध्ये शोकाकूल पसरले आहे.
सुरगीश्वर मठाचे १२ वे मठापती म्हणून काम करत असताना ४५ वर्ष धार्मिक, आध्यात्मिक आणि लिंगायत तत्वाचा प्रचार-प्रसार केला.
सीमाभागात अनेक मठ व मंदिराची त्यांनी उभारणी केले. तर गुरूकूल पद्धतीने वैदिक ज्ञान दिले. बंगळूरच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून साहित्य अलंकार ही पदवी घेतली. २९ जानेवारी २०२० रोजी मठाचे उत्तराधिकारी म्हणून स्वामीजीची नियुक्ती झाली होती.
सकाळी निर्वाणाची बातमी कानावर पडताचं भाविकांनी महास्वामीजींंच्या अंतिम दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. 2 वाजता मिरवणूकीला सुरूवात होणार आहे.