प्रतिनिधी / कोल्हापूर
जेष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केलेल्या संशयीत आरोपी सचिन अंदूरे व भरत कुरणे या दोघानी दाखल केलेल्या जामीन अर्ज सुनावणीअंती न्यायालयाने सोमवारी ( २४ ऑगस्ट ) फेटाळला.
या अर्जाची जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्या समोर सुनावणी झाली. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यत सचिन अंदूरे, भरत कुरणेसह २१ जणांविरोधी गुन्हे करुन, १९ जणांना अटक केली आहे. आकोळकर व पवार हे दोघे अद्यापी फरार आहे. याचा तपास यंत्रणेकडून कसून शोध घेतला जात आहे.
याच दरम्यान, अटक केलेल्या अंदूरे आणि कुरणे या दोघांनी आपली जामिनावर सुटका करावी, याकरीता जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर सरकारी पक्षाकडून व या दोघा संशयितांच्या वकीलाच्याकडून युक्तीवाद करण्यात आला. या युक्तीवादावेळी संशयित आरोपी अंदूरे व कुरणे याचा अप्रत्यक्ष पानसरे हत्येचा कट रचण्यामध्ये सहभाग आहे. त्यांना जामीन दिल्यास साक्षीदारांच्यावर दबाव येवू शकतो. त्यामुळे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी विशेष सरकारी वकीलांनी न्यायालयासमोर केली होती.