उदगाव /वार्ताहर
संततधार पाऊस व पूरस्थिती निर्माण झाल्याने तसेच अनेक महामार्ग बंद झाल्याने सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव तालुका शिरोळ ते सांगली मिरज पर्यंत दिवसभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली . दिवसभर या मार्गावरून संथ गतीने वाहतूक सुरू होती.
पुराची परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले. त्यातच सांगली कोल्हापूर बायपास मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाल्याने सांगली मिरज तसेच जयसिंगपूर हुन कोल्हापूर कडे जाणारे वाहनांचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्यातच येथील कृष्णा नदीवरील पूरपरिस्थिती पाण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढल्याने ही वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतूक नियोजन करण्याचे काम दिवसभर सुरू होते. पुराच्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी स्थलांतर सुरू असल्याने या वाहतुकीच्या कोंडीमुळे अडचण निर्माण झाली