अंबाई टॅक परिसरातील घटना, तिघांचे कृत्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
पूर्ववैमनस्यातून अंबाई टॅक परिसरात तरुणावर भरदिवसा तलवार हल्ला करण्यात आला. आज, शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये अक्षय रवींद्र यादव (वय 26 रा. रविवार पेठ) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या हातावर, मानेवर, कानावर वर्मी घाव घालण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाई टॅक परिसरातील एका हॉटेलमध्ये अक्षय यादव हा काम करतो. गुरुवारी रात्री त्याचा रविवार पेठ येथील जय शिवराय गल्ली येथे तरुणाबरोबर वाद झाला. एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून मुजफर मोमीन, रायाज मोमीन, अकीब झाकीर मोमीन यांच्या सोबत वाद झाला होता. हा वाद गल्लीतील नागरिकांनी मिटवला होता. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अक्षय अंबाई टॅक येथील हॉटेल मध्ये साफ सफाई चे काम करत होता. यावेळी मुजफर मोमीन, रायाज मोमीन, अकीब झाकीर मोमीन हे तिघे दुचाकीवरून तेथे आले. त्यांना पाहून अक्षय पळत सुटला. त्याचा पाठलाग करून तिघांनी त्याच्यावर फिल्मी स्टाईलने हल्ला केला.
या हल्ल्यात अक्षयच्या हातावर, मानेवर आणि कानावर वर्मी घाव घालण्यात आले आहेत. याची माहिती अक्षयच्या मित्रांना मिळाली त्यांनी दुचाकीवरून त्याला सिपीआर रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.