प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर – पेईंग गेस्ट म्हणून राहणाया महिलेनेच घर मालकीणीच्या घरातून रोकड व दागिणे चोरल्याची घटना करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे घडली. संबंधित माहिलेने रोख रक्कम, 2 तोळे दागिने असा एकूण 94 हजार रुपयांचा गंडा घातला. याबाबत करवीर पोलिसात स्नेहा दिलीप सातपुते (रा.सुभाषनगर) या संशयित भाडेकरूवर गुन्हा दाखल झाला.
याबाबत हकीकत अशी,रोहिणी होनमोरे या करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे राहतात. त्यांच्याकडे 13 मे रोजी संशयित उच्च शिक्षीत स्नेहा सातपुते ही महिला भाडेकरू म्हणून राहण्यास आली. मुंबई येथे आपला कापडाचा व्यवसाय आहे. सध्या लॉक डाऊन असल्यामुळे आपण काही दिवस येथे राहणार असल्याचे तिने सांगितले होते. सातपुते यांनी रोहिणी होनमोरे यांचा विश्वास संपादन करून 19 जून अखेर होनमोरे यांच्या मोबाईल कार्डचा वापर केला. या द्वारे त्यांच्या खात्यावरून ऑनलाईन रक्कम काढून घेतली. त्याचबरोबर होनमोरे यांच्या आईच्या पर्समधील 15 हजाराची रोकड आणि कपाटातील 22 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा असा एकूण 94 हजारांचा गंडा घातला. तसेच होनमोरे यांच्या आधार, पॅन, सहीचा नमुन्यासह इतर कागदपत्रांचीही सॉफ्ट कॉपी चोरून नेली असल्याची फिर्याद होनमोरे यांनी दिली. त्यानुसार संशयित सातपुते हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक फौजदार भगवान गिरीगोसावी करीत आहेत.