पेठ वडगाव/प्रतिनिधी :
युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रा. शिंदेवाडी येथील संग्रामसिंह दशरथ गुडेकर (वय २४, रा.शिंदेवाडी, ता.पन्हाळा) याच्या विरोधात पिडीत मुलीने वडगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी गुडेकर याचेवर वडगाव पोलिसांनी अत्याचार, जीवे मारण्याचा प्रयत्न, बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली आहे. यास वडगाव न्यायालयाचे न्यायमूर्तीसमोर उभे केले असता त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या बाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, नवे पारगाव येथील एका युवतीशी ओळखीतून प्रेमाचे नाटक करून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर संग्रामसिंह गुडेकर याने पन्हाळा येथील लॉजवर नेवून वारंवार अत्याचार केला. त्याचे फोटो त्यानं मोबाईलमध्ये काढले होते. त्यानंतर तो वारंवार पिडीत युवतीला फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन वडणगे, वागबीळ येथील लॉज नेऊन वारंवार बलात्कार केला.
दरम्यान या पीडित मुलीने पिडीत मुलीने माझ्याशी लग्न कधी करणार का असे मोबाईलवरून कॉल करून विचारले असता त्याने मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही असे सांगून तिच्याशी बोलणे बंद केले. दरम्यान संग्रामसिंह याने मी तुला दिलेल्या वस्तू परत कर असे तिला सांगितले होते. या वस्तू परत करण्यासाठी पिडीत युवती वारणानगर येथे आपल्या मैत्रिणीसोबत गेली होती. त्या वस्तू वारणानगर येथे त्याला देवून परत गावाकडे गावातील युवक महेश फुणे याच्यासोबत परत येत असताना संग्रामसिंह याने या पिडीत मुलगीच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर टाकून पेटविण्याच्या प्रयत्न केला. यावेळी तेथे आजुबाजूचे लोक जमा झाल्याने संग्रामसिंह तेथून पळून गेला.
यावेळी आजूबाजूचे लोक जमल्याने संग्रामसिंहने तेथून पळ काढला. युवतीने घडलेला प्रकार वडिलांना सांगून वडगाव पोलिसात युवकांविरोधात तक्रार दाखल केली . या प्रकरणी संशयित संग्रामसिंह याचे विरोधात अनुसुचित जाती अत्याचार, जीवे मारण्याचा प्रयत्न, बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.