प्रतिनिधी / कोल्हापूर
आधीच कोरोनामुळे रिक्षा, लॉरी व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेदिवस वाढ होत आहे. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा याची चिंता वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे. इंधन दरवाढीच्या विरोधात शनिवारी मिरजकर तिकटी येथे सर्व रिक्षा, लॉरीसह वाहनधारक संघटनांच्यावतीने निदर्शन करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेलची दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बाबा पार्टे जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी विविध रिक्षा संघटना, लॉरी व इतर वाहनधारक संघटनांचे पदाधिकाऱयांसह मनसेचे राजू जाधव, शिवसेनेचे किशोर घाटगे, बाळासो पाटील, प्रकाश भोसले, प्रवीण पाटील, राहुल शिंगारे , श्रीकांत माने, हिंदुराव घाटगे, बाबुराव गुरव, बंटी पाटील कुमार खुराटे, चंद्रकांत बराले, प्रकाश घाटगे, संदीप मोहिते, बाबा चव्हाण, राजू मुजावर, सुभाष पाटील, गणपती पाटील, नंदू पाटील यांच्यासह शहरातील सर्व रिक्षा चालक, मालक कार्यकर्ते उपस्थित होते.