प्रतिनिधी / पेठ वडगांव
येथील कोविड सेंटरच्या उभारणीसाठी मदत करणार्या विजयसिह यादव प्रतिष्ठान,वडगांव व्यापारी असोसिएशन आणि प्रतिष्ठित व्यापारी हिरालाल राठोड आदी सर्वांच्या दातृत्वाचा सन्मान वडगांव वासियांसाठी ऊर्जा देणारा ठरला आहे. या कोविड सेंटरच्या मदतीसाठी दानशूरांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले. या कोविड सेंटरसाठी प्रशासनाकडून आवश्यक सर्व मदत करू अशी ग्वाही खासदार माने यांनी दिली.
अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेल्या येथील नगरपालिकेच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या ६० खाटांच्या कोविड सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी खासदार धैर्यशील माने बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोहनलाल माळी हे होते.दरम्यान आमदार राजुबाबा आवळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, जयसिंगपूर पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष शरद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोविड सेंटर उभारणी लोकसहभागातून करण्यात आली आहे. दरम्यान, कोविड रुग्णांना येथील विजयसिह यादव प्रतिष्ठानच्या नेत्या विद्या पोळ यांच्या वतीने दररोज चहा, अल्पोहार, जेवण देण्यात आले. येथील व्यापारी हिरालाल राठोड यांनी सर्व रुग्णांना लागणारा ऑक्सिजन सिलेंडर सेट दिला आहे. व्यापारी असोसिएशनच्या वतीने रुग्णांच्या बेड साठी लागणाऱ्या सर्व वस्तू देण्यात आल्या आहेत. वडगांव पोलीस ठाणेच्या वतीने शंभर किलो तांदूळ अशी मदत देण्यात आली. यावेळी दानशुराच्या सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या शुभारंभास महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी युवक क्रांती महाआघाडी व स्वर्गीय शिवाजीराव सालपे फौडेशनच्या वतीने कोरोना संसर्गाच्या सुरवातीच्या काळापासून अलगीकरणात ठेवलेल्या लोकांना जेवण, नाष्टा अशा सर्व सुविधा दिल्या आहेत. या कोविड सेंटरसाठी लागेल ती मदत पुरविणार असल्याचे सालपे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक संदीप पाटील, कालिदास धनवडे, दीपक खरोशे, नगरसेविका सुनिता पोळ, मैमुन कवठेकर, नम्रता ताईगडे, अलका गुरव, शबनम मोमीन, विरोधी नगरसेवक जवाहर सलगर यांचेसह माजी नगराध्यक्ष अभिजित पोळ, राजकुमार पोळ, रणजीतसिंह यादव, अभीजीत गायकवाड, व्यापारी हिरालाल राठोड, मनोज शहा, राहुल काळे, संपतराव दिंडे, संतोष लडगे, डॉ. बी. आर. पाटील, सुनील माने, अंकुश माने, राजू कवठेकर आदीसह मान्यवर उपस्थित होते.
कोविड सेंटरला मदतीचा ओघ……
वडगांव शहराच्या दक्षिणेला धन्वतरी रुग्णालय आहे.या रुग्णालयात सुमारे ६० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड सेंटर मधील रुग्नाच्या मदतीसाठी आमदार राजुबाबा आवळे यांनी विधानसभेतील एक महिण्याचे मानधन भेट देण्याचे जाहीर केले. सर्व सोयींनीयुक्त असलेल्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना मोफत विजयसिह यादव प्रतिष्ठानच्या वतीने जेवण,अल्पोहार, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यवस्थ रुग्णांना व्यापारी हिरालाल राठोड, विकास राठोड परिवाराकडून ऑक्सिजन सेट देण्यात आला आहे. व्यापारी असोसिएशन ने रुग्नाच्या बेडसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू पुरविण्यात आले आहेत.अशा विविध दानशूर व्यक्तीच्या मदतीने झालेले कोविड सेंटर लोक सहभागाचा एक आदर्श बनले आहे.