प्रतिनिधी/पेठ वडगाव
वडगाव पालिकेच्या सत्ताधारी युवक क्रांती महाआघाडीचे नगरसेवक शरद पाटील यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांचेकडे सादर केला. महाआघाडीच्या कोअर कमिटीत घेतलेल्या निर्णय व धोरणानुसार उपनगराध्यक्ष शरद पाटील यांनी हा राजीनामा दिला आहे. पुढील कार्यकाळासाठी उपनगराध्यक्ष पदाकरीता मनसेचे शहराध्यक्ष व महाआघाडीचे नगरसेवक संतोष चव्हाण यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
या राजीनाम्यानंतर महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे या स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिलेल्या दिपक खरोशे यांचाही लगेचच राजीनामा घेण्याची शक्यता आहे. आघाडी नेत्या प्रविता सालपे या नगरसेवक खरोशे यांचा राजीनामा घेवून स्वीकृत नगरसेवक पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबतही महाआघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता आहे.